Salary Increment : भारतीय कंपन्यांमध्ये यावर्षी पगारवाढीचा कल स्थिर राहण्याची शक्यता आहे. डेलॉइट इंडियाच्या 'टॅलेंट आऊटलूक सर्व्हे'नुसार, २०२६ मध्ये सरासरी वेतनवाढ ९.१% राहण्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या ९.०% च्या तुलनेत किंचित जास्त आहे. आर्थिक अनिश्चितता आणि वाढता खर्च लक्षात घेता कंपन्यांनी पगारवाढीच्या बाबतीत सावध पवित्रा घेतला आहे.
कोणत्या क्षेत्रात किती वाढ?
- यावर्षी मॅन्युफॅक्चरिंग आणि औषध निर्माण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
- लाईफ सायन्सेस : सर्वाधिक ९.९% पगारवाढीचा अंदाज.
- मॅन्युफॅक्चरिंग: ९.८% पर्यंत इंक्रीमेंट अपेक्षित.
- आयटीईएस : या क्षेत्रात मात्र सुस्ती असून, पगारवाढ घटून ८.५% पर्यंत खाली येऊ शकते.
- इतर : कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये पगारवाढ स्थिर राहण्याची चिन्हे आहेत.
ज्युनियर कर्मचाऱ्यांची चांदी!यावर्षी कंपन्यांनी आपल्या बजेटचा मोठा हिस्सा ज्युनियर कर्मचारी आणि 'इंडिविज्युअल कॉन्ट्रिब्युटर्स'कडे वळवला आहे. या वर्गातील कर्मचाऱ्यांना सरासरी ९.७% पर्यंत, म्हणजेच सर्वात जास्त पगारवाढ मिळण्याची शक्यता सर्वेक्षणात वर्तवण्यात आली आहे.
'सीईओ'च्या पगारात ५ टक्क्यांचीच वाढ
- अहवालानुसार, व्यावसायिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पगारातील वाढीचा वेग मंदावला आहे.
- सरासरी पगार : २०२५-२६ मध्ये बिगर-प्रवर्तक सीईओंचा सरासरी पगार १०.५ कोटी रुपये इतका झाला आहे.
- वाढीचा दर : वार्षिक आधारावर यात केवळ ५% वाढ झाली आहे, जी कोव्हिड-१९ नंतरची सर्वात कमी वाढ ठरली आहे.
वाचा - ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय?
पगारवाढ स्थिर राहण्याची प्रमुख कारणे
- डेलॉइट इंडियाचे पार्टनर आनंदोरूप घोष यांच्या मते, पगारवाढ ९ टक्क्यांच्या आसपास स्थिर राहण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.
- नवे लेबर कोड्स : नवीन कामगार कायद्यांमुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होण्याची भीती आहे.
- एआय मधील अनिश्चितता: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यात मनुष्यबळाच्या गरजेबाबत कंपन्या साशंक आहेत.
- भू-राजकीय तणाव: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा कंपन्यांच्या बजेटवर नेमका काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Web Summary : Indian companies' salary increments are expected to remain stable. Manufacturing and pharmaceuticals offer good news, while ITES faces sluggish growth. Junior employees may see the highest hikes due to budget shifts.
Web Summary : भारतीय कंपनियों में वेतन वृद्धि स्थिर रहने की उम्मीद है। विनिर्माण और फार्मास्यूटिकल्स में अच्छी खबर है, जबकि आईटीईएस में सुस्ती है। बजट बदलाव के कारण कनिष्ठ कर्मचारियों को सबसे अधिक वेतन वृद्धि मिल सकती है।